जेनेलिया-रितेशच्या चिमुकल्याचं नाव आहे...

रितेश आणि जेनेलिया सध्या आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. नुकतंच त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यानं प्रवेश केलाय. याच चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्याच्या निमित्तानं संपुर्ण देशमुख कुटुंब एकाच छताखाली जमलं होतं. 

Updated: Dec 6, 2014, 04:01 PM IST
जेनेलिया-रितेशच्या चिमुकल्याचं नाव आहे...  title=

मुंबई : रितेश आणि जेनेलिया सध्या आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. नुकतंच त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यानं प्रवेश केलाय. याच चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्याच्या निमित्तानं संपुर्ण देशमुख कुटुंब एकाच छताखाली जमलं होतं. 

25 नोव्हेंबर रोजी जेनिलियाला पुत्ररत्नाचा लाभ झाला. या चिमुकल्यासहीत जेनेलिया-रितेशनं 29 तारखेला घरात नव्यानं प्रवेश केला. या, चिमुकल्याचा नामकरण विधी सोहळा 6 डिसेंबर रोजी मुंबईत देशमुखांच्या घरी पार पडलाय. यावेळी, या चिमुकल्याचं नाव ठेवण्यात आलंय 'रिआन रितेश देशमुख'... हा आनंद आणि बाळाचं नाव रितेशनं सोशल वेबसाईट ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय. 

Our Son 'RIAAN RITEISH DESHMUKH'

— Genelia Deshmukh (@geneliad) December 6, 2014

रितेश सध्या बाबा होण्याचं सुख अनुभवतोय... तो म्हणतोय...  

Mission Possible -successfully changed the first baby diaper. Was more nervous than giving my first shot in front of the camera.

— Riteish Deshmukh (@Riteishd) December 5, 2014

आई होण्याचं सुखही जेनेलियाला अत्युच्च आनंदाचा क्षण वाटतोय. तिनंही आपला हा आनंद ट्विटरवर तिच्याच शब्दांत शेअर केलाय. 

... Heaven is what I feel.. Magicallllllllllll .. Thank u again

— Genelia Deshmukh (@geneliad) November 30, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.