जेव्हा 'सेलिब्रिटी' आया पडतात मुलांच्या भांडणात...

बॉलीवूडची अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया आणि दिवंगत दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडणं झालीत. हे भांडण इथंच संपलेलं नाहीए तर यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. 

Updated: Dec 5, 2014, 10:38 PM IST
जेव्हा 'सेलिब्रिटी' आया पडतात मुलांच्या भांडणात...  title=

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया आणि दिवंगत दिग्दर्शक रामानंद सागर यांची पणती साक्षी यांच्यात एका पबमध्ये जोरदार भांडणं झालीत. हे भांडण इथंच संपलेलं नाहीए तर यानंतर या दोन्ही अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. 

मध्य मुंबईस्थित लोअर परेल भागातील ‘ट्राइस्ट पब’मध्ये आलिया (१७ वर्षे) आणि साक्षीमध्ये (१७ वर्षे) काही कारणावरून जोरदार भांडणं झालं होतं. आलिया पबमध्ये आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा करत होती तर यावेळी साक्षी तिथं तिची आई आणि एका मैत्रिणीसोबत उपस्थित होती. यानंतर पूजा बेदी आणि मिनाक्षी यांच्यातही वादावादी झाली होती. 

पूजा बेदी हिच्या म्हणण्यानुसार, तिनं मीनाक्षी सागर (साक्षीची आई) आणि साक्षीविरुद्ध एफआयआर दाखल केलाय. आपल्या मुलीला मारहाण, शिविगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप पूजा बेदीनं केलंय. एसएमएस, टेलिफोन आणि सोशल मीडियावर आलियाबद्दल, आपल्या आईबद्दल (प्रोमिता बेदी) आणि माझा माजी पती (फरहान इब्राहिम फर्नीचरवाला) यांच्याबद्दल सागर कुटुंबीयांनी अपमानास्पद भाषाही वापरली, असा आरोप पूजा बेदी हिनं केलाय. 

दुसरीकडे, साक्षीची आई मीनाक्षी सागर यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार, आलिया आणि तिच्या कथित मित्रांनी नशेत साक्षीवर हल्ला केल्याचं म्हटलं गेलंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.