सलमानचा भाऊ अरबाज खान परदेशी महिलेच्या प्रेमात

 अरबाजच्या आयुष्यात परदेशी महिला आलेय.

Updated: Jun 17, 2016, 11:28 PM IST
सलमानचा भाऊ अरबाज खान परदेशी महिलेच्या प्रेमात title=

मुंबई : अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटासंदर्भात बातमी येऊन थडकली होती. आता ही बातमी खरी ठरण्याची शक्यता आहे. कारण अरबाजच्या आयुष्यात परदेशी महिला आलेय.

दरम्यान, ती परदेशी महिला कोण होती ते गुलदस्त्यातच आहे. अरबाज-मलायका यांच्यातील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यामगील मुख्य कारण अर्जुन कपूर आहे की ही परदेशी महिला याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. 

अभिनेता अरबाज खानला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी महिलेबरोबर होता. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलेय. गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानने अरबाज आणि मलायकामधील दुरावा कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरेच ठरले असल्याचे समजते आहे. 
 
मलायका अरबाजपासून वेगळी राहत आहे. ती खारमधील भाड्याच्या घरात मुलगा अरहानसोबत राहत आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते. ५ वर्ष एकमेंकाच्या प्रेमात अखंड बुडाल्यानंतर १२ डिसेंबर १९९८ रोजी मलायका आणि अरबाज लग्नाच्या बेडीत अडकलेत.