बिपाशा बसूचा चेहरा जळाला

बिपाशा बसूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'डर सबको लगता है' या हॉरर शोचं होस्टिंग करणाऱ्या बिपाशावर शुटिंगसाठी तयार होत असताना तिच्या हेअर स्टाईलिस्टकडून एक गरम हेअर टोंग तिच्यावर पडलं ज्यामुळे तिचा चेहरा आणि हात जळाला.

Updated: Nov 26, 2015, 11:11 PM IST
बिपाशा बसूचा चेहरा जळाला title=

मुंबई : बिपाशा बसूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 'डर सबको लगता है' या हॉरर शोचं होस्टिंग करणाऱ्या बिपाशावर शुटिंगसाठी तयार होत असताना तिच्या हेअर स्टाईलिस्टकडून एक गरम हेअर टोंग तिच्यावर पडलं ज्यामुळे तिचा चेहरा आणि हात जळाला.

या घटनेमुळे दु:खी झालेल्या बिपाशानं चेहरा आणि हाथ जळाल्याचे फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत. सोबतच ती म्हणते की जळालेल्या हात आणि चेहऱ्यासोबत मी शुटींगला सुरुवात केली. आणि त्या गोष्टीच्या माझ्या चेहऱ्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता.

बिपाशाने ही गोष्ट ट्विटरवर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तिची विचारणी केली. त्यानंतर बिपाशाने आणखी एक ट्विट करुन ती व्यवस्थित असल्याचं सांगितलं आणि काळजी घेणाऱ्या चाहत्यांचे आभारही मानले.

सुखरूप असल्याचं सांगण्यासाठी बिपाशाने आणखी एक फोटो शेअर केला ज्यात मेकअप करत असताना ती तिच्या चेहऱ्याला हेअर टोंगपासून वाचवण्यासाठी आरशाचा आधार घेतांना दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.