मुंबई: फुवाद खान दिग्दर्शित 'धरम संकट मे' या सिनेमाची खासियत म्हणजे यातली तगडी स्टार कास्ट... परेश रावल, नसिरुद्दीन शहा आणि अन्नू कपूर...
कथा
एका ब्राह्मण हिंदूची ही कथा आहे.. जी भूमिका साकारलीय अभिनेता परेश रावलनं. तो एक कट्टर हिंदू असतो. पण एक दिवस त्याची खरीखुरी ओळख त्याला कळते. तो खरंतर एका ब्राह्मण हिंदू कुटुंबानं दत्तक घेतलेला मुसलमान मुलगा असतो. जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा काय घडतं. आपल्या खऱ्या आई-बाबांच्या शोधात तो निघतो, पण त्याच्या आई बाबांशी त्याची भेट होवू शकत नाही. त्याच्या पुढे एक अट घातली जाते. मुस्लिम धर्माचा अभ्यास केला तरच तो आपल्या खऱ्या आई वडिलांना भेटू शकतो अशी अट एक इमाम त्याला घालतो. यानंतर काय घडंत ही या सिनेमाची खरी मजा आहे.
अभिनय
या सिनेमाची संपूर्ण जबाबदारी खरं तर एकट्या परेश रावल यांनीच आपल्या अभिनयाच्या जोरावर सांभाळली आहे. सिनेमाचा पहिला भाग दिग्दर्शक फुवाद खान यांनी खूप इन्टरेस्टिंग पदधतीनं हाताळली आहे. मात्र इंटर्वलनंतर सिनेमाचा फ्लेवर हरवला जातो. हा सिनेमा एक टिपिकल बॉलिवूड इमोशनल ड्रामा असाच वाटतो. तसं पहायला गेलो तर या सिनेमाची स्टोरी याचा खरा यूएसपी आहे. पण कुठेतरी त्याची मांडणी करताना दिग्दर्शक मागे पडलाय.
केवळ आणि केवळ परेश रावल यांच्या जबरदस्त अभिनयामुळं या सिनेमाला मी देतेय अडीच स्टार्स..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.