मुंबई : यशराज बॅनरचा नविन सिनेमा येत आहे. 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', असं या सिनेमाचे नाव आहे. यात सुशांत राजपूत याची प्रमुख भूमिका आहे. सुशांतबरोबर रोमान्स करताना दिसणार आहे स्वास्तिका मुखर्जी.
एका १४ वर्षांच्या मुलीची आई असणाऱ्या स्वास्तिकाला या सिनेमात बाथ टबच्या दृष्यात न्यूड व्हावे लागले आहे. या चित्रपटात ती अंगुरीदेवीची व्यक्तीरेखा निभावत आहे.
स्वास्तिका मुखर्जी हिचे बंगाली सिनेमामध्ये मोठे नाव आहे. बंगाली सिनेमा आणि टीव्हीवर काम करण्याला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बंगली सिनेमात बोल्ड काम करण्याचे वावगे नाही.
बॉलिवूडमध्ये काम करताना आई झालेल्या अभिनेत्रींना मुख्य भूमिका मिळत नाही. मात्र, स्वास्तिकाला १४ वर्षांची मुलगी असूनही तिला मुख्य भूमिका मिळाली आहे. तसेच टब बाथमध्ये ती न्यूड दिसत आहे. सर्वसामान्य सिनेमात ज्या भूमिका कराव्या लागतात, त्या मी केल्या आहेत. मी आधी लग्न केले. मला मूल झाले. त्यानंतर मी करिअरवर लक्ष दिले, असे स्वास्तिका सांगते.
माझ्या सिनेमाचा प्रोमो मित्रमैणींनी पाहीला आणि मला फोन केला. तू खूप हॉट आणि सेक्सी दिसत आहे. याचे श्रेय मी जरुर घेईन. बंगालीमध्ये अनेक नामांकित अभिनेत्री आहेत. मात्र, त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. मी संघर्ष केला नाही. मी बंगालीत पुन्हा आले, असे तिने स्पष्ट केले.
पाहा व्हि़डिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.