अरे बापरे... म्हणजे रणवीर जळून खाक होणार?

'xXx : रिटर्न ऑफ क्झंडर केज' या आपल्या हॉलिवूड पटातून दीपिका सगळ्यांनाच घायाळ करून टाकणार असं दिसतंय... पण, या चित्रपटामुळे रणवीरलाही थोडी 'इनसिक्युरिटी' फील होऊ शकते.

Updated: Feb 11, 2016, 12:40 PM IST
अरे बापरे... म्हणजे रणवीर जळून खाक होणार? title=

नवी दिल्ली : 'xXx : रिटर्न ऑफ क्झंडर केज' या आपल्या हॉलिवूड पटातून दीपिका सगळ्यांनाच घायाळ करून टाकणार असं दिसतंय... पण, या चित्रपटामुळे रणवीरलाही थोडी 'इनसिक्युरिटी' फील होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, 'बाजीराव-मस्तानी'फेम दीपिका या सिनेमात विन डिझेलसोबत काही हॉट सिन्स देणार आहे. या लव्ह शेअरींगमुळे साहजिकच रणवीरची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.  

xXx चं पहिलं पोस्टर लॉन्च झाल्यानंतर विन आणि दीपिकाच्या सुपर्ब केमिस्ट्रीविषयी चर्चा सुरू झालेलीच आहे... आता पाहुयात... तिचा हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये किती खळबळ उडवून देतोय.