मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा हा व्हिडीओ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे, दीपिकाने आपली चॉईस ठरवली आहे. दीपिकाने नेमकं या व्हिडीओत काय म्हटलंय पाहा.
'वो इंडिया'सोबत दीपिकाने हा व्हिडीओ शूट केला आहे, ज्यात म्हटलंय, "माझं शरीर, माझे विचार, माझा निर्णय", महिला सशक्तिकरणावर आधारीत या व्हिडीओचं नाव आहे, 'माय चाईस म्हणजेच माझा निर्णय' .
हा व्हिडीओ तुम्हाला बातमीच्या सर्वात खाली पाहता येईल
दीपिका या व्हिडीओत म्हणते "मी एक महिला आहे, मला माझ्याशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, हा अधिकारी कोणते कपडे मी परिधान करावेत, विवाह करावा, किंवा करू नये, किंवा विवाहाच्या आधी सेक्स करावा किंवा करू नये, हा देखिल माझा निर्णय आहे".
महिलांचे खासगी निर्णयांवर व्हिडीओमध्ये दीपिका म्हणते, मी कोणत्याही पुरूषांसोबत प्रेम करत असेल, किंवा महिलेशी, अथवा दोघांवर, हा निर्णय माझा आहे. २ मिनिटं आणि ३४ सेकंदाचा हा व्हिडीओ होमी अदजानिया यांनी निर्देशित केला आहे.
दीपिकाचं 'माय चॉईस'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.