अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

Updated: Mar 22, 2015, 07:55 PM IST
अभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल   title=

कोलकाता: अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

कोलकाता इथल्या कंपनीस दहा पट पैशांचे आमीष दाखवत नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लावणं अभिनेत्री शिल्पा शेट्टीला चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा यांच्याविरोधात कोलकाता पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रिपू सदन कुंद्रा यांच्या इसेंशिअल स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं कोलकाता इथल्या एम. के. मिडीया प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीला दोन वर्षात १० पट परतावा मिळेल असं आमिष दाखवत त्यांना नऊ कोटी रुपयांची गुंतवणूक करायला सांगितले. यानुसार एम. के. मिडीयानं शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीत गुंतवणूकही केली. या व्यवहारानंतर शिल्पा शेट्टी यांच्या कंपनीनं इएसपीएलचे ३० लाख रुपयांचे इक्विटी शेअर्सही दिले होते. मात्र काही महिन्यांनी हा सर्व प्रकार बोगस असून इक्विटी शेअर्सही बोगस असल्याचं कंपनीच्या लक्षात आलं.  याप्रकरणी एम. के. मिडीयाचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी कोलकाता इथल्या हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आर्थिक फसवणूक, कट रचणं अशा विविध कलमांखाली शिल्पा शेट्टींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिल्पा शेट्टी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.