"सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतोय"

सेन्सॉर बोर्डावर राष्ट्रीय चित्रपट विजेते सिनेदिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी  सडकून टीका केली आहे. सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतो आहे, तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचेही विशाल भारद्वाज यांनी म्हटलंय.

Updated: Mar 22, 2015, 09:43 AM IST
"सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतोय" title=

मुंबई : सेन्सॉर बोर्डावर राष्ट्रीय चित्रपट विजेते सिनेदिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी  सडकून टीका केली आहे. सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखा वागतो आहे, तसेच सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचेही विशाल भारद्वाज यांनी म्हटलंय.

विशाल भारद्वाज यांनी आपल्या सिनेमांमध्ये शिव्यांचा अनेकवेळा वापर केला आहे. यामुळे अनेकदा त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, सिनेमामध्ये त्या त्या संवादाला आणि प्रसंगाला शिव्यांची गरज होती, असेही विशाल भारद्वाज यांनी म्हटले आहे. 

जेथे खरोखर सिनेमासाठी शिव्यांच्या संवादाची गरज आहे, त्यांच्या वापरामुळे सिनेमाचा विषय नेहमीच उत्तम झालाय. असंही भारद्वाज यांनी म्हटलं आहे. 

सेन्सॉर बोर्डावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे, जणेकरुन सिनेमातील कलेवर त्याचे परिणाम होणार नाहीत, असेही भारद्वाज यांनी म्हटले आहे.

लेखन, गायन, संगीत, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सिनेमाशी निगडीत सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे विशाल भारद्वाज यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कामगिरीवर उघडपणे भाष्य केल्याने, त्यावर मोठ्य़ाप्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाचे निर्णय पाहता सेन्सॉर बोर्ड तालिबान्यांसारखं वागत असल्याचा आरोप विशाल भारद्वाज यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी याबाबत केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांचीही भेट घेतली होती.

सेन्सॉर बोर्ड कायमच वादाच्या भोवऱ्यात असतो. मात्र सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांच्या राजीनाम्यानंतर आणि पहलाज निहलानी यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर वाद वाढले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.