पहिल्या दिवशीच्या कमाईत एअरलिफ्ट वरचढ

सनी लिओन, तुषार कपूरचा 'क्या कूल है हम ३' आणि अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' हे दोन सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित झालेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. 

Updated: Jan 23, 2016, 12:41 PM IST
पहिल्या दिवशीच्या कमाईत एअरलिफ्ट वरचढ title=

मुंबई : सनी लिओन, तुषार कपूरचा 'क्या कूल है हम ३' आणि अक्षय कुमारचा 'एअरलिफ्ट' हे दोन सिनेमे शुक्रवारी प्रदर्शित झालेत. बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. 

मात्र पहिल्या दिवशी 'क्या कूल'च्या तुलनेत अक्षयचा 'एअरलिफ्ट' सरस ठरला. 'एअरलिफ्ट'ने पहिल्या दिवशी १२.३५ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे पॉर्न कॉम असलेल्या 'क्या कूल है हम ३'ने ७.५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. 

समीक्षकांप्रमाणेच प्रेक्षकांनीही पहिल्या दिवशी एअऱलिफ्टला चांगली पसंती दर्शवली. यापूर्वी अक्षयच्या हॉलीडे (११.६६), गब्बर इज बॅक (१२.३१), ब्रदर्स (१३.६८), सिंग इज ब्लिंग (१८.३२) कोटी कमावले होते.