BOX OFFICE 2015: बॉलिवूडची नंबर १ फिल्म बनणार 'बजरंगी भाईजान'

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' बॉक्स ऑफिसवर धम्माल करतोय. चित्रपटानं ६ दिवसांमध्ये जवळपास १७० कोटींची कमाई केलीय. एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिस कमाईची स्पीड पाहता चित्रपटानं नवा रेकॉर्ड केलाय. 

Updated: Jul 23, 2015, 12:26 PM IST
BOX OFFICE 2015: बॉलिवूडची नंबर १ फिल्म बनणार 'बजरंगी भाईजान' title=

मुंबई: बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' बॉक्स ऑफिसवर धम्माल करतोय. चित्रपटानं ६ दिवसांमध्ये जवळपास १७० कोटींची कमाई केलीय. एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिस कमाईची स्पीड पाहता चित्रपटानं नवा रेकॉर्ड केलाय. 

बॉक्स ऑफिसवर सलग सहाव्या दिवशी जबरदस्त प्रदर्शन करत सलमानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान'नं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार सारख्या स्टार्सना मागे टाकत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

बुधवारी १८.०२ कोटींची कमाई करून घरगुती बॉक्स ऑफिसवर जिथ १६९.०७ कोटींचा गल्ला चित्रपटानं जमवला. त्यासोबतच दुसरीकडे २०१५मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

'बजरंगी भाईजान'नं या कमाई सोबतच कंगणा राणावतचा सुपरहिट चित्रपट 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'चा रेकॉर्ड तोडलाय आणि नवा रेकॉर्ड प्रस्तापित केलाय. तनु वेड्स मनू रिटर्न्सनं १५२ कोटींची कमाई केली केली होती. आतापर्यंत २०१५मधील सर्वाधिक कमाई केलेली ती फिल्म होती. मात्र आता १७० कोटींची कमाई करून 'बजरंगी भाईजान' नव्या रेकॉर्डकडे वळलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.