'सलमाननं 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट दिला नाही'

नुकतंच लग्न झालेल्या बिपाशा बासूला सलमान खाननं 10 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याच्या चर्चा सुरु होत्या.

Updated: Jun 17, 2016, 04:29 PM IST
'सलमाननं 10 कोटींचा फ्लॅट गिफ्ट दिला नाही' title=

मुंबई : नुकतंच लग्न झालेल्या बिपाशा बासूला सलमान खाननं 10 कोटी रुपयांचा फ्लॅट गिफ्ट दिल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर आता खुद्द बिपाशा बासूनं स्पष्टीकरण दिलं आहे. सलमाननं मला असं कोणतंही गिफ्ट दिलं नसल्याची प्रतिक्रिया बिपाशानं दिली आहे. 

आत्तापर्यंत मी ज्या काही बेकार बातम्या ऐकल्या, त्यापैकी ही एक आहे. मी असं गिफ्ट कोणाकडून का घेईन, असं बिपाशा म्हणाली आहे. बिपाशा आणि करणसिंग ग्रोव्हरनं एप्रिलमध्ये लग्न केलं होतं. या दोघांच्या लग्नाला सलमान, शाहरुख आणि बच्चन कुटुंबियांनी हजेरी लावली होती.