'सुल्तान' येणार चला हवा येऊ द्यामध्ये

झी मराठीवरील सगळ्यात फेमस ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बॉलिवूडलाही भुरळ पाडली आहे.

Updated: Jun 17, 2016, 03:49 PM IST
'सुल्तान' येणार चला हवा येऊ द्यामध्ये title=

मुंबई : झी मराठीवरील सगळ्यात फेमस ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने आता संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बॉलिवूडलाही भुरळ पाडली आहे.

शाहरूख, सोनम यांसारखे बॉलिवूडचे अनेक स्टार्स या शोमध्ये आलेत. असे असतानाच आता सलमान खानलाही 'चला हवा येऊ द्या'चे वेड लागले आहे. सलमान खान त्याच्या ‘सुल्तान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर येणार असल्याचे नक्की झाले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा टीआरपी खुणावू लागल्याने प्रेक्षक वर्ग आकर्षित करण्यासाठी अनेक हिंदी कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत.

भाऊ कदम भेटला सलमानला

सलमान खान आणि भाऊ कदम यांच्या फोटोमुळे सलमान खरच या शोमध्ये येणार का असे सुलतानच्या फॅन्सना वाटत होते. भाऊ कदम याने सलमानची भेट घेतली तेव्हा त्यांनी फोटो काढला होता. दोघांचा फोटो पाहूनच या चर्चेला उधाण आले आहे. पण सलमान खान या शोमध्ये येणार हे नक्की झाले आहे. फक्त या एपिसोडचे चित्रीकरण थोडे पुढे ढकलण्यात आले आहे.