मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बनविण्यात येणारा चित्रपट अटकला आहे. याचे कारण स्वतः धोनी आहे.
या वर्षाच्या सुरूवातीला अशी बातमी आली होती की, धोनी या चित्रपटासाठी होकार दिला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी. ‘ए वेनसडे’च्या नीरज पांडेकडे देण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूत हा धोनीची भूमिका साकारणार होता. इतकेच नाही तर सुशांतने धोनीच्या रांची येथील निवासस्थानी जाऊन रिसर्च सुरू केला होता. या बाबात मुंबईतील एका हॉटेलमध्ये धोनी आणि सुशांतची भेट झाली होती.
पण आता अशी बातमी समोर येत आहे की, चित्रपट अडचणीत सापडला आहे. पैशांवरून प्रकरण थांबले आहे. असे सांगितले जात आहे की, स्वतःवर चित्रपट काढण्यासाठी धोनीने ४५ कोटी रुपये मागितले आहे. छोट्या बजेटची फिल्म बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नीरज पांडे आणि चित्रपटाचे निर्माते या प्रोजेक्ट बाबत पुनर्विचार करीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.