बिग बॉस ९ फायनल : मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोशेल कोणाला सर्वाधिक मत

  बिग बॉस ९ च्या अंतीम निकाल जाहीर होण्यास काही तासांचा अवधी आहे. त्यात आता मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोषेल हे चार सदस्य घरात शिल्लक आहेत.

Updated: Jan 22, 2016, 09:52 PM IST
बिग बॉस ९ फायनल :  मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोशेल कोणाला सर्वाधिक मत     title=

लोणावळा  :  बिग बॉस ९ च्या अंतीम निकाल जाहीर होण्यास काही तासांचा अवधी आहे. त्यात आता मंदना, प्रिन्स, रिषभ आणि रोषेल हे चार सदस्य घरात शिल्लक आहेत.

१०४ दिवसांच्या घमासान युद्धानंतर हे चार धुरंधर घरात शिल्लक असून वोटिंग लाइन बंद होण्यासाठी आता केवळ पाच तास शिल्लक आहेत. त्यात कोणी बाजी मारली हे पाहू  या..

आता पर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या मतांनुसार...

चौथ्या स्थानावर - गेल्या आठवड्यात सर्वाधिक मत मिळविणारी रोशेल असून पण अजून काहीही होऊ शकते. रोशेलही हा शो जिंकू शकते.

तिसरे स्थान - मंदना करिमी हिला तिसऱ्या क्रमांकाची मते आहेत. पण आता गेल्या काही तासांत तीला मिळणाऱ्या मतांची संख्या वाढत आहे.

दुसरे स्थान - सर्वांना वाटत आहे की डार्क हॉर्स रिषभ आहे. तो मतांच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

पहिल्या स्थान - गेल्या सिझनमध्ये लोकांना जसे वाटत होते की गौतम गुलाटी बिग बॉसची स्पर्धा जिंकणार तसं काहिसा इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रिन्स हा पहिल्या स्थानावर असून तो विजेता होण्याची शक्यता आहे.