‘बिग बॉस’च्या आठव्या सिझनची धमाकेदार सुरुवात

‘बिग बॉस सिझन- 8’ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा बिग बॉसच्या सिझनचं होस्टिंग करतांना दिसतोय. यावेळी ‘बिग बॉस’चं घर हे जुन्या विमानाच्या रुपात दिसत आहे.

Updated: Sep 22, 2014, 09:02 PM IST
‘बिग बॉस’च्या आठव्या सिझनची धमाकेदार सुरुवात  title=

मुंबई : ‘बिग बॉस सिझन- 8’ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा बिग बॉसच्या सिझनचं होस्टिंग करतांना दिसतोय. यावेळी ‘बिग बॉस’चं घर हे जुन्या विमानाच्या रुपात दिसत आहे.

या शोमधील 15 स्पर्धेकांमधील जास्त स्पर्धेक हे बॉलिवूडचे आहेत. उदाहरणार्थ आर्य बब्बर, मिनिषा लांबा, उपेन पटेल, आइटम गर्ल नताशा स्तांकोविक, ग्रान्ड मस्तीमधील अभिनेत्री करिश्मा तन्ना आणि ‘द एक्सपोज’ अभिनेत्री सोनाली राउत आदी कलाकारांचा समावेश आहे.   

बिग बॉसनं विमान रुपी घर बनविलं असून सलमान हा पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. सर्व स्पर्धेक तीन महिने एकत्र राहणार आहेत. सुकृति कांडपाल, सोनी सिंह, ‘दीया और बाती’मधील गौतम गुलाटी आणि ‘महाभारत’मधील शकुनिची भुमिका करणारा प्रणित भट्ट या टिव्ही कलाकारांचा यात समावेश आहे.

कलाकारांव्यतिरिक्त मॉडेल डायेन्ड्र सोरेस आणि सुशांत दिवगीकर या शोमध्ये दिसतील. आणखीही तीन स्पर्धेकांचा यात समावेश आहे. पण, त्याच्या नावाचा खुलासा चॅनेलनं अद्याप तरी केला नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.