बिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.

Updated: Aug 31, 2015, 12:42 PM IST
बिग बींचं ट्विटर अकाऊंट हॅक, ट्विट करून दिली माहिती title=

मुंबई: बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना हॅकर्सचा फटका बसला असून त्यांचं ट्विटर अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खुद्द बिग बी यांनीच ही घटना उघडकीस आणली आहे.

आणखी वाचा - ...जेव्हा अभिषेक बच्चनचाही फोन कट केला जातो!

अमिताभ बच्चन यांचं @SrBachchan हे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं आणि ते पॉर्न साईट्स 'फॉलो' करत असल्याचं दाखवण्यात आलं. अमिताभ यांनी स्वत:च काही वेळापूर्वी ट्विट करून ही घटना उघडकीस आणली.  

आणखी वाचा - कसा शोधाल ई-आधारकार्डचा PDF पासवर्ड

वयाची सत्तरी पार केलेले अमिताभ बच्चन कामात कितीही व्यग्र असले तरी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. 'ट्विटर' आणि 'फेसबूक'च्या अकाऊंटवर लाखो फॉलोअर्स असून बिग बी त्यांच्याशी नेहमीच कनेक्टेड असतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.