वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ 'बिग बॉस-९'मध्ये दिसणार!

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ नेहमी वादात असलेला रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध न्यूज वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मेकर्सने स्पर्धक निवडण्याचं काम सुरू केलंय. 

Updated: Aug 31, 2015, 10:50 AM IST
वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ 'बिग बॉस-९'मध्ये दिसणार! title=

मुंबई: वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ नेहमी वादात असलेला रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध न्यूज वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मेकर्सने स्पर्धक निवडण्याचं काम सुरू केलंय. 

यासंदर्भात राधे माँचीही त्यांनी बेट घेतलीय. सर्व काही ठीक असलं तर राधे माँ यंदा बिग बॉसच्या घरात दिसू शकेल. 

आणखी वाचा - सलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग

राधे माँचा मिनी स्कर्टवाला फोटो वायरल झाल्यानंतर आणखी वाद झाला. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी एका महिलेनं राधे माँ विरुद्ध तक्रार केलीय. 

तसंच काही दिवसांपूर्वी पहिले राधे माँची भक्त असलेली आणि आता राधे माँच्या विरोधात असलेली टिव्ही अभिनेत्री डॉली बिंद्रानं राधे माँ लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. डॉली बिंद्राही यापूर्वी बिग बॉसची स्पर्धक राहिलीय. आपल्याला सतत जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप डॉली बिंद्रानं लावलाय.

आणखी वाचा - राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

इंटरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये अनेक फॉलोअर्स

मनोरंजन क्षेत्रामध्ये राधे माँचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातील काही आता वादानंतर राधे माँपासून दूर झाले आहेत. डॉली बिंद्रा, दिव्यंका त्रिपाठी, मनोज तिवारी, प्रल्हाद कक्कड, सुभाष घई आणि गजेंद्र चौहान यांच्यासोबत राधे माँचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरलही झाले आहेत. 

आणखी वाचा - झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशननंतर राधे माँ विरुद्ध धर्मरक्षक महासंघाकडून तक्रार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.