'बेफ्रिके'ची तीन दिवसांत 34.36 कोटी रुपयांची कमाई

चित्रपट समीक्षकांनी रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या बेफ्रिकेला फारशी पसंती दिली नसली तरी या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत चांगला गल्ला जमवलाय.

Updated: Dec 12, 2016, 02:52 PM IST
'बेफ्रिके'ची तीन दिवसांत 34.36 कोटी रुपयांची कमाई title=

मुंबई : चित्रपट समीक्षकांनी रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या बेफ्रिकेला फारशी पसंती दिली नसली तरी या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत चांगला गल्ला जमवलाय.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत 34.36 कोटी रुपये कमावलेत. शुक्रवारी या सिनेमाने 10.36 कोटी रुपयांची कमाई केली.

त्यानंतर शनिवारी 11.60 कोटी रुपये तर रविवारी या सिनेमाने 12.40 कोटी कमावलेत. या सिनेमात रणवीर आणि वाणीची सिझलिंग केमिस्ट्री पाहायला मिळतेय.