आदित्य-श्रद्धाच्या 'ओके जानू'चा ट्रेलर लाँच

आशिकी 2मधील जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ओके जानू या सिनेमाद्वारे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Updated: Dec 12, 2016, 01:23 PM IST
आदित्य-श्रद्धाच्या 'ओके जानू'चा ट्रेलर लाँच title=

मुंबई : आशिकी 2मधील जोडी आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ओके जानू या सिनेमाद्वारे ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झालाय. मणी रत्नम यांच्या ओके कनमनी या तामिळ सुपरहिट सिनेमाचा हा रिमेक आहे. 

ओके जानू ही लव्हस्टोरी आहे आदी आणि ताराची. आदीच्या भूमिकेत आदित्य रॉय कपूर आहे तर ताराची भूमिका साकारलीये श्रद्धा कपूरने. यासोबतच नसरुद्दीन शहा यांचीही यात भूमिका आहे.