बाळासाहेब ठाकरेंवरील सिनेमाचे म्युझिक लाँच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत 'बाळकडू' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या हस्ते या सिनेमाचं म्युझिक लाँच करण्यात आलं.

Updated: Jan 6, 2015, 08:00 PM IST
बाळासाहेब ठाकरेंवरील सिनेमाचे म्युझिक लाँच title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारीत 'बाळकडू' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्या हस्ते या सिनेमाचं म्युझिक लाँच करण्यात आलं.

या वेळी मराठी सिनेसृष्टीतल अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या संकल्पनेतून हा सिनेमा आकारला आला असून स्वप्ना पाटकर यांनी बाळकडूची निर्मिती केलीय तर अतुल काळे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

अभिनेता उमेश कामत आणि नेहा पेंडसे यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. बाळकडूच्या म्युझिक लाँचसाठी अनेक सेलिब्रिटिंनी हजेरी लावली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.