निर्मात्यानं ३ महिने डांबलं, शिवसेनाप्रमुखांनी सोडवलं – सुप्रिया पाठारे

अभिनेत्री सुप्रिया पाठारेनं राजस्थानच्या एका निर्मात्यावर आरोप केलाय. राजस्थानमध्ये एका फिल्मच्या शूटिंग दरम्यान एका निर्मात्यानं तिला तब्बल तीन महिने डांबून ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोडवलं, असं सुप्रियानं सांगितलं. 

Updated: Jan 6, 2015, 12:08 PM IST
निर्मात्यानं ३ महिने डांबलं, शिवसेनाप्रमुखांनी सोडवलं – सुप्रिया पाठारे title=

ठाणे: अभिनेत्री सुप्रिया पाठारेनं राजस्थानच्या एका निर्मात्यावर आरोप केलाय. राजस्थानमध्ये एका फिल्मच्या शूटिंग दरम्यान एका निर्मात्यानं तिला तब्बल तीन महिने डांबून ठेवलं होतं. मात्र दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोडवलं, असं सुप्रियानं सांगितलं. 

ठाण्यात ‘महिला सुरक्षा परिसंवादात’ बोलतांना अभिनेत्री आरोप लावला. तिनं सांगितलं कशाप्रकारे राजस्थानमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिला नेलं गेलं? दरम्यान, निर्मात्याचं नाव आणि घटनास्थळाबाबत तिनं स्पष्ट सांगितलं नाही. 

सुप्रिया म्हणते, शूटिंगसाठी मी इथून एकटी गेली होती. पुढील तीन महिने बंदुकीची भिती दाखवून माझ्याकडून अभिनय करवून घेतला. यादरम्यान मला डांबून ठेवलं होतं, असं सुप्रिया सांगते. तिला फक्त आपल्या कुटुंबियांशी फोनवरून बोलण्याची परवानगी होती. 

सुप्रिया सांगते, तिला मराठीत बोलण्यास बंदी घातली होती. मात्र मी कशाप्रकारे तरी गुप्त भाषेचा प्रयोग करून माझ्या बहिणीला आपल्या स्थितीबद्दल सांगितलं. मग माझ्या कुटुंबियांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मदत मागितली यानंतर बाळासाहेबांच्या सांगण्यावरुन राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला."

"एक दिवस राजस्थान पोलिसांतील ५० शिपाई माझ्या शोधासाठी आले आणि माझी सुटका केली. त्यानंतर मला कळलं की बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं. २० तासांचा प्रवास करुन मी सुरतला पोहोचले आणि यावेळी माझ्याकडे अवघे १२ रुपये शिल्लक राहिले होते. पण सुखरुप सुटकेसाठी मी आयुष्यभर बाळासाहेबांची ऋणी राहिन," असं सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.