धमाका... बाहुबलीनंतर आता १००० कोटी रुपयांचा चित्रपट

जगभरात नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करणारा 'बाहुबली' चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौलीचा आत्मविश्वास आता खूप वाढवाल. बाहुबलीचं बजेट २५० कोटी रुपये होतं. चित्रपटानं ऐतिहासिक यश मिळवलंय. 

Updated: Oct 6, 2015, 02:03 PM IST
धमाका... बाहुबलीनंतर आता १००० कोटी रुपयांचा चित्रपट title=

मुंबई: जगभरात नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करणारा 'बाहुबली' चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौलीचा आत्मविश्वास आता खूप वाढवाल. बाहुबलीचं बजेट २५० कोटी रुपये होतं. चित्रपटानं ऐतिहासिक यश मिळवलंय. 

आता राजामौली आपल्या दुसऱ्या भव्य दिव्य चित्रपटासाठी सज्ज झालेत. या चित्रपटाचं बजेट असेल १००० कोटी रुपये...

आणखी वाचा - लेखकाने मौन सोडलं, 'कटप्पाने बाहुबलीला का मारलं?'

भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजपर्यंत इतकी महागडी फिल्म कधी बनली नाही... आतापर्यंत कोणत्याही चित्रपटानं 'बाहुबली' इतका व्यवसाय केला नाही. आता राजामौली यांच्या नव्या चित्रपटाचं नाव असेल 'गरूडा'. यात प्रमुख भूमिकेत असेल मोहनलाल. 

प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल राजामौलींचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांच्याशिवाय अनेक प्रसिद्ध सुपरस्टार 'गरूडा'मध्ये दिसतील.

आणखी वाचा - कोडं उलगडलं! कटप्पाने बाहुबलीला का मारले! पुढची काहणी आमच्या हाती...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.