'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं

'मला वेड लागले प्रेमाचे', 'चल हवा आणे दे' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब परत येतोय. पण यावेळी तो 'दगडू' नाही 'देवा'च्या भूमिकेत आहे. 'टाईमपास'च्या यशानंतर प्रसिद्ध झालेला प्रथमेश आपल्या त्याच रावडी अंदाजात 'उर्फी' या चित्रपटात दिसणार आहे.

Updated: Oct 6, 2015, 12:34 PM IST
'दगडू' झाला 'देवा', प्रथमेश 'उर्फी'मध्ये करतोय 'धनक-धनक', ऐका गाणं title=

मुंबई: 'मला वेड लागले प्रेमाचे', 'चल हवा आणे दे' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा प्रथमेश परब परत येतोय. पण यावेळी तो 'दगडू' नाही 'देवा'च्या भूमिकेत आहे. 'टाईमपास'च्या यशानंतर प्रसिद्ध झालेला प्रथमेश आपल्या त्याच रावडी अंदाजात 'उर्फी' या चित्रपटात दिसणार आहे.

राजश्री प्रॉडक्शनचा 'उर्फी' येत्या २३ ऑक्टोबरला रिलीज होतोय. 'उर्फी' love साठी anything या शीर्षकावरूनच ही सुद्धा टाईमपास सारखी एक लव्हस्टोरी असेल, असं वाटतंय. 

यात प्रथमेशची नायिका आहे मिताली मयेकर... मिताली मयेकरनं यापूर्वी शाहरुखच्या बिल्लू बार्बर चित्रपटात गुंजाची भूमिका केलीय. 'उर्फी' चित्रपटातील पहिलं गाणं 'धनक-धनक' रिलीज झालंय. या गाण्याचा ठेका आपल्यालाही नाचायला भाग पाडणारा आहे. 

तेव्हा ऐका हे गाणं -  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.