मुंबई: सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मानं तिचा भाऊ सलमान आणि रोमानियाची टिव्ही कलाकार लूलिया वंतूरनं साखरपुडा केला नसल्याचं सांगितलंय.
Do not believe everything you read in the papers or on different websites online.
— Arpita Khan Sharma (@khanarpita) October 19, 2015
परदेशी मीडियामध्येही गुपचुप या दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी होती. पुढील वर्षी हे दोघं निकाह करणार असल्याचीही चर्चा होती. अर्पितानं ट्विटरवर लिहिलं की, वृत्तपत्र आणि विविध वेबसाइटवर वाचलेल्या बातमीवर विश्वास ठेवू नका...
'बजरंगी भाईजान'चा निकाह नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय होतो. मात्र सलमान सध्या 'बिग बॉस-९'च्या होस्टिंगमध्ये आणि त्याचा आगामी चित्रपट 'सुल्तान'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
आणखी वाचा - सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.