पाहा बिग बींची नात नव्या कशी करतेय आपल्या करिअरला सुरूवात

महानायक बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पॅरिसमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या फॅशन इव्हेंट 'Le Bal'मध्ये भाग घेतेय. पॅरिसमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अनेक देशांच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधून तब्बल 25 मुली सहभाग घेणार आहेत.

Updated: Oct 14, 2015, 04:08 PM IST
पाहा बिग बींची नात नव्या कशी करतेय आपल्या करिअरला सुरूवात title=

मुंबई: महानायक बॉलिवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा पॅरिसमध्ये 28 नोव्हेंबरला होणाऱ्या फॅशन इव्हेंट 'Le Bal'मध्ये भाग घेतेय. पॅरिसमध्ये होणाऱ्या या इव्हेंटमध्ये अनेक देशांच्या सेलिब्रिटी फॅमिलीमधून तब्बल 25 मुली सहभाग घेणार आहेत.

वय वर्ष 17 असलेली नव्याच्या करिअरचा 'Le Bal'पासून डेब्यू होणार आहे. दरम्यान, मधल्या काही काळात अशीची बातमी होती की, नव्याला बॉलिवूडमधून ऑफर मिळत आहेत. मात्र नव्यानं जागतिक मंचावरून डेब्यू करणं पसंत केलंय.

नव्याची आई आणि बिग बींची मुलगी श्वेता बच्चन नंदा पण आपल्या मुलीच्या तयारीत लागलीय. पॅरिसच्या मेकअप आर्टिस्ट सोबत नव्याच्या तयारीचे फोटो आपण पाहू शकतो. लंडनमध्ये वाढलेली नव्या नंदा डांस मूव्स चांगल्या करण्यासाठीही मेहनत घेतेय.

पाहा नव्याच्या प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.