... हा आहे 'बिग बॉस'चा खराखुरा बॉस!

'बिग बॉस'चा नववा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. 'बिग होस्ट' सलमान खानमुळे हा शो अधिक चर्चेत असतो. पण, सलमान खानशिवाय या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण आहे... आणि ते म्हणजे 'बिग बॉस'चा आवाज...

Updated: Oct 14, 2015, 03:48 PM IST
... हा आहे 'बिग बॉस'चा खराखुरा बॉस! title=

नवी दिल्ली : 'बिग बॉस'चा नववा सीझन धुमधडाक्यात सुरू झालाय. 'बिग होस्ट' सलमान खानमुळे हा शो अधिक चर्चेत असतो. पण, सलमान खानशिवाय या कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण आहे... आणि ते म्हणजे 'बिग बॉस'चा आवाज...

या कार्यक्रमातल्या बिग बॉसचा कणखर आवाज कुणाचा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे... हा आवाज आहे अतुल कुमार याचा... अतुलचा आवाज तुम्ही बहुतेकदा रेडिओ किंवा टीव्हीवर ऐकला असेल... 


अतुल कपूर आणि करिश्मा तन्ना

दमदार आणि कडक आवाज असल्यानं त्यांचा आवाज शांत, धीर-गंभीर अशा बिग बॉसच्या आवाजासाठी त्यांची निवड करण्यात आली... बिग बॉसच्या सहभागींवर एखाद्या मुख्याध्यापकाप्रमाणे लक्ष ठेवून त्यांना वेळोवेळी समज देण्याचंही काम त्यांच्यावरच सोपवण्यात आलंय. 

ज्याप्रमाणे 'बिग बॉस'च्या स्पर्धकांना घरातल्या सदस्यांशिवाय कुणालाही भेटण्याची परवानगी नाही, त्याचप्रमाणे अतुललाही एक वेगळा रुम देण्यात आलाय. त्यामुळे, संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत अतुललाही कुणाला भेटता येत नाही. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.