शाहरूख, आमीर, सलमानपेक्षा 'बिग बी'आघाडीवर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ट्वीटरवर सुद्धा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. कारण ट्वीटरवर त्यांच्या फॅन्सची संख्या आता १.४ कोटी झाली आहे.

Updated: Apr 1, 2015, 06:02 PM IST
शाहरूख, आमीर, सलमानपेक्षा 'बिग बी'आघाडीवर title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता ट्वीटरवर सुद्धा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. कारण ट्वीटरवर त्यांच्या फॅन्सची संख्या आता १.४ कोटी झाली आहे.

ट्वीटरवरील फॅन्सच्या संख्येत अमिताभ बच्चन यांनी शाहरूख, आमिर आणि सलमानलाही मागे टाकले आहे. शाहरूखचे ट्वीटरवर १.२ कोटी, आमिरचे १.१९ कोटी, सलमानचे १.१२ कोटी फॅन्स आहेत. हिरोइन्स मध्ये प्रियांका चोप्रा ९३ लाख फॅन्ससह आघाडीवर आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्वीटरवर १.४ कोटी, फेसबुकवर २ कोटी, ब्लॉगवर ३० लाख अशाप्रकारे त्यांचे जवळपास ४ कोटी फॅन्स सोशल मिडियावर आहेत. बिग बी सोशल मिडियाद्वारे आपल्या फॅन्सच्या नेहमीच संपर्कात राहतात. ते आपल्या खाजगी आणि प्रोफेशनल लाइफचे क्षण आपल्या फॅन्ससोबत शेअर करतात. आजवर त्यांनी ट्वीटरवर ३९ हजार ७०० ट्वीट केले आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.