सुरत: सध्या आपला आगामी चित्रपट 'एक पहेली लीला'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अभिनेत्री सनी लिऑन विरोधात सुरतमध्ये एका व्यक्तीनं एफआयआर दाखल करवली आहे.
तसं घडलं असं की, आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पती डॅनियल वेबरसोबत सुरतला पोहोचलेल्या सनीला बघण्यासाठी झालेल्या गर्दीमुळं तिथं अफरा-तफरी माजली. यानंतर आयोजकांनी व्हेन्यू बदलला. सनीचा हा इव्हेंट ५ स्टार हॉटेलहून बदलून दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट केला गेला.
स्थानिकांपैकी एका व्यक्तीनं सनी विरुद्ध तक्रार नोंदवली. त्याचं म्हणणं होतं की, सनी फिल्म प्रमोशनसाठी नाही तर दुसऱ्या कारणानं शहरात आहे. व्यक्तीनं आरोप केला की, गर्दी गोळा करण्यासाठी सनीचे टॉपलेस फोटो इथं वाटण्यात आले, जे की चुकीचं आहे.
लोकांनी हा दावा केलाय की, सनीचा हा टॉपलेस फोटो सुरतमध्ये डायमंड मर्चंटच्या पार्टीदरम्यान घेतला गेला, जो की एप्रिलमध्ये वायरल झाला होता. तर इतर बातम्यांनुसार सनीचा हा फोटा मकाऊमध्ये एका पार्टीत घेतला गेला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.