...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते.

Updated: Feb 6, 2016, 04:54 PM IST
...म्हणून एक बाप म्हणून अक्षय कुमारला अभिमान वाटला title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विशाखापट्टणममध्ये 'इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू'साठी आले होते. या कार्यक्रमासाठी 'खिलाडी' अक्षय कुमारचा मुलगा आरव कुमारही उपस्थित होता.

हा कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांची भेट घेतली. त्यात ते आरवलाही भेटले. आरवला भेटल्यावर त्यांनी आरवचा कान पकडला.

अक्षय कुमारने हा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय. 'देशाच्या पंतप्रधानाने आपल्या मुलाचा कान पकडावा आणि त्याला 'गुड बॉय' म्हणावं हा एक वडील म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे', असं त्याने ट्वीट केलंय.
ट्विटरवर सध्या या फोटोची जब्बरदस्त चर्चा सुरू आहे.