अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय. 

Updated: Jan 26, 2016, 05:12 PM IST
अक्षयकुमारचा आमिर खानवर हल्लाबोल title=

मुंबई : असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अभिनेता आमिर खानवर जोरदार टीका झाली. अत्युल्य भारतमधून आमिरला डच्चू देण्यात आला. आता तर अभिनेता अक्षयकुमारने जोरदार हल्लाबोल केलाय. अशी भडक विधाने कोणीही करु नये, असा सल्लाही दिला.

देश सोडून जाण्याच्या वक्तव्यावर ही टीका केली. प्रत्येक देशात चढउतार येतच असतात. मात्र कोणीही अशा प्रकारची भडक विधाने करणे सुरु करायला नको. अशा घटना होतच असतात; परंतु दुर्दैवाने आम्ही अशा चुकीच्या घटनाच उचलून धरतो, असे अक्षय म्हणाला.

साहित्यिक, विचारवंत आणि शास्त्रज्ञांनी पुरस्कार वापसी सुरु केली होती. त्यातच नोव्हेंबरमध्ये पत्नी किरण रावने देशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण देश सोडून जायला हवे, असे म्हटल्याचे विधान केल्यामुळे आमिर खान वादात अडकला होता. 

मी येथेच जन्मलो, येथेच मरणार : आमिर
दरम्यान, मी किंवा पत्नी किरण रावने देश सोडून जायचे आहे, असे कधीच म्हणालो नव्हतो. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतले गेले. काही अंशी त्याला मीडियाही जबाबदार आहे. मी येथेच जन्माला आलो आणि येथेच मरणारही आहे. माझ्या विधानामुळे जे दुखावले गेले, त्यांचा भावना मी समजू शकतो, असे स्पष्टीकरण आमिरने दिले आहे.