अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

Updated: Nov 5, 2015, 09:24 AM IST
अक्षय कुमार पुन्हा धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, ४० लाखांची मदत title=

उस्मानाबाद: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलाय. शेतकऱ्यांसाठी त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे.

अक्षयनं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४० लाखांची मदत जाहीर केलीय. इथल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना अक्षय मदत करणार आहे. 

आणखी वाचा - नाना, मकरंदनंतर आता अक्षय दुष्काळग्रस्तांच्या मदतीला, ९० लाखांची मदत

यापूर्वी अक्षयनं बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ९० लाखांची मदत केलीय. तर सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठीही अक्षयनं ५० लाख दिलेत. 

अक्षय कुमार आपलं सामाजिक भान पुरेपुर जपतोय. तर तिकडे बॉलिवूडचे इतर कलाकार भांडणात दंग आहेत. 

यापूर्वी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी 'नाम' या संस्थेची स्थापना करून सामान्य नागरिकांनाही शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलंय.

आणखी वाचा - दुष्काळग्रस्तांना मदत करायचीय, नाना-मकरंदने जाहीर केला अकाऊंट नंबर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.