नवी दिल्ली: देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय.
आणखी वाचा - अनुपम खेर यांच्याकडून भाजप नेत्यांनाच कानपिचक्या
खेर यांच्या भूमिकेशी अभिनेत्री रविना टंडनही सहमत आहे. ती सुद्धा दिल्लीतल्या मोर्चात सामील होण्याची शक्यता आहे. देशातल्या वाढत्या असहिष्णूतेविरोधात अनेक चित्रपट कलावंतांनी राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची मोहीम सुरू केलीय. पण असहिष्णूता पसरवण्याचा आणि पुरस्कार परत करण्याचा काहीही संबंध नाही, असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलंय.
आणखी वाचा - पुरस्कार परत करणाऱ्या फिल्ममेकर्सवर अनुपम खेर भडकले
इकडे शाहरुख खाननं वाढत्या असहिष्णूतेबद्दल वक्तव्य केल्यावर भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी टीका केलीय. साध्वी प्राचींनीतर शाहरुखला थेट पाकिस्तानी एजंट म्हटलंय. यापार्श्वभूमीवर शाहरूखच्या मुंबईतल्या मन्नत बंगल्याची सुरक्षा वाढण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.