अजय देवगणच्या 'शिवाय'चे पाकिस्तान कनेक्शन

अजय देवगणची निर्मिती असलेल्या शिवाय या सिनेमात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेता वीर दास याने केलाय.

Updated: Oct 13, 2016, 03:51 PM IST
अजय देवगणच्या 'शिवाय'चे पाकिस्तान कनेक्शन title=

मुंबई : अजय देवगणची निर्मिती असलेल्या शिवाय या सिनेमात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा खुलासा अभिनेता वीर दास याने केलाय.

या सिनेमात प्रेक्षकांना बघण्यासारखे बरेच काही आहे. तसेच वीरदास या सिनेमात पाकिस्तानी हॅकरची भूमिका निभावतोय. 

याव्यतिरिक्त वीरदासने त्याच्या भूमिकेबाबत अधिक खुलासा केलेला नाहीये. त्याने इतकेच सांगितले की तो पाकिस्तानी हॅकरची भूमिका करत असला तरी ती भूमिका नकारात्मक नाहीये. 

शिवाय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा विश्वासही वीरदासने यावेळी व्यक्त केला. 28 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होतोय. 'शिवाय'चा सामना करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाशी होणार आहे.