'मस्करीची काहीतरी हद्द असते', रणबीरनं अनुष्काला सुनावलं

करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येतेय.

Updated: Oct 13, 2016, 10:29 AM IST
'मस्करीची काहीतरी हद्द असते', रणबीरनं अनुष्काला सुनावलं  title=

मुंबई : करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येतेय.

पण, या सिनेमाचं शुटींग सुरु असताना सेटवर अनुष्कानं रणबीरच्या सणसणीत कानाखालीही लगावली होती... आणि याचा रणबीरला चांगलाच रागही आला. 'मस्करीची काहीतरी हद्द असते' असं यानंतर रणबीरनं अनुष्काला सुनावलं. 

रणबीर चांगलाच रागावलाय हे पाहून मग अनुष्कानंही एक पाऊल मागे घेत त्याची माफी मागितली. हा किस्साही कॅमेऱ्यात कैद झालाय.