रणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय. 

Updated: Dec 29, 2015, 02:22 PM IST
रणबीरसोबत किसींग सीन देण्यास ऐश्वर्याचा नकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही लवकरच आपल्या आगामी 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात अभिनेता रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु, या सिनेमात रणबीरसोबत किसींग सीन देण्यास मात्र ऐश्वर्यानं नकार दिलाय. 

'ऐ दिल है मुश्किल'च्या सेटवर ऐश्वर्यानं आपल्या को-स्टारला किस करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात रणबीरसोबत इंटीमेट सीन करण्याबद्दल ऐश्वर्यानं दिग्दर्शक करण जोहरसोबत संवाद साधलाय. 

या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरशिवाय अनुष्का शर्मादेखील दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणनंही आपल्या सिनेमात यापद्धतीचं कोणतंही चित्रिकरण न करण्याचा निर्णय घेतलाय. करणचा हा सिनेमा येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. 

ऐश्वर्या राय बच्चन लग्नानंतर 'धूम २' या सिनेमात अभिनेता ऋतिक रोशनसोबत किसींग सीन करताना दिसली होती. त्यामुळे, रणबीरसोबत असे सीन करण्यास नकार देणारी ऐश्वर्या सध्या चर्चेत आहे.