मुंबई : गेल्या आठवड्यात आलेल्या खिलाडी अक्षट कुमारच्या 'एअरलिफ्ट' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली होती.
Updated: Jan 25, 2016, 04:58 PM IST
मुंबई : गेल्या आठवड्यात आलेल्या खिलाडी अक्षट कुमारच्या 'एअरलिफ्ट' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली होती. भारताने १९९१ साली पहिल्या आखाती युद्धाच्या वेळी केलेल्या बचाव कार्यावर हा सिनेमा बेतलेला आहे.
हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही आता हिट झालाय. प्रदर्शित झालेल्या दिवसापासून हा सिनेमा भरपूर गल्ला जमवतोय.
कालपर्यंत या चित्रपटाने ४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी म्हणजे रिलीज झालेल्या दिवशी या चित्रपटाने १२.३५ कोटी कमावले. शनिवारी १४ कोटी रुपयांचा, तर काल १७.३५ कोटी रुपयांचा बिझनेस या चित्रपटाने केला आहे.
म्हणजेच चित्रपटाचं वीकेण्ड कलेक्शन आहे ४४.३० कोटी रुपये इतकं. हे अक्षय कुमारच्या जानेवारी २०१५ मध्ये आलेल्या 'बेबी'च्या वीकेण्ड कलेक्शनपेक्षाही (३५.९० कोटी रुपये) जास्त आहे.
अक्षयच्या एअरलिफ्टने बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचं यशस्वी उड्डाण केलं, असं म्हणायला आता हरकत नाही.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.