नवी दिल्ली : नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी रविवारी सिने सृष्टीतील प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं... शशी कपूर यांना हा पुरस्कार मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका गौरव कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी बी - टाऊनच्या अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली.
याच कार्यक्रमात बीग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे पिता-पुत्रदेखील उपस्थित झाले होते. उल्लेखनीय म्हणजे, याच कार्यक्रमात अभिनेत्री रेखा आणि कपूर खानादानाची मुलगी करिश्मा कपूर यादेखील उपस्थित होत्या.
खुर्चीवर बसलेल्या अरमान जैन आणि त्याचा भाऊ आदर जैन यांच्याशी हात मिळवताना अभिषेकनं बाजुलाच बसलेल्या करिश्मा कपूरला मात्र नजरअंदाज केलं. या कार्यक्रमाला करिश्माची बहिण करिना कपूर दिसली नसली तरी तिचा पती सैफ अली खान यानं मात्र आवर्जुन उपस्थिती लावली.
याच दरम्यान, अमिताभ बच्चन आणि रेखाही उपस्थित होते... पण, दोघांनी एकमेकांकडे पाहणं हेतूपूर्वक टाळलं.... आणि याच निमित्तान बच्चन पिता-पुत्रांना थोडं अवघडलेले क्षण अनुभवयला मिळाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.