आमिर खान असं काय म्हणाला, त्याने सनी लिऑन झाली हैराण

 नुकत्याच दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत आपल्या करिअर संदर्भात करण्यात आलेल्या प्रश्नांना बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन दिलेल्या उत्तरांमुळे अभिनेता आमिर खान याने तिची प्रशंसा केली होती. 

Updated: Jan 26, 2016, 07:09 PM IST
आमिर खान असं काय म्हणाला, त्याने सनी लिऑन झाली हैराण  title=

मुंबई :  नुकत्याच दिलेल्या एका टीव्ही मुलाखतीत आपल्या करिअर संदर्भात करण्यात आलेल्या प्रश्नांना बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन दिलेल्या उत्तरांमुळे अभिनेता आमिर खान याने तिची प्रशंसा केली होती. 

एका ट्विटमध्ये आमिर खान म्हटला होता की मला जर  चांगली स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्की सनी लिऑनसोबत काम करेल. मला काहीच प्रॉमब्लेम नाही. मला उलट आनंद होईल असे आमीर खान म्हटला होता. 

यावर सनी लिऑन म्हटली आमीरकडून मिळालेल्या समर्थनाबद्दल मला अजूनही खरं वाटत नाही आहे. मी हैराण झाली आहे की आमिर खान अशी प्रतिक्रिया देऊन शकतो यावर मला विश्वास बसत नाही. आम्ही एकत्र काम केले नाही तरी चालेल, पण मी कायम त्याची फॅन राहील असे सनी लिऑनने म्हटले आहे. 

यापूर्वी अनेक सेलिब्रिटीजने सनी लिऑनचे समर्थन केले होते आणि मुलाखत खूप असभ्य आणि सेक्सिस्ट म्हटले होते.