'तू मेरी 'जिंदगी' है...' भट्ट कॅम्पच्या 'आशिकी'ची 25 वर्ष

23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित आशिकी  या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भूरळ घालतात..आशिकीला 25 वर्ष पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे. 

Updated: Jul 23, 2015, 10:32 PM IST
'तू मेरी 'जिंदगी' है...' भट्ट कॅम्पच्या 'आशिकी'ची 25 वर्ष title=

मुंबई : 23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित आशिकी  या सिनेमाने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. या सिनेमाची गाणी आजही सगळ्यांना भूरळ घालतात..आशिकीला 25 वर्ष पूर्ण झाली असून तरुणाईमध्ये आजही आशिकीची क्रेझ कायम आहे. 

90च्या दशकात या सिनेमाने रसिकांना अक्षरश: वेड लावले होतं..या सिनेमाची गाणी तर आजही सिनेरसिकांच्या ओठावर आहेत. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची प्रमुख भूमिका असलेल्या आशिकीने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळविलं होतं. बॉलिवूडमध्ये इतिहास घडविणाऱ्या या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. 23 जुलै 1990 साली प्रदर्शित झालेल्या महेश भट दिग्दर्शित या प्रेमकथेने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले होते. 

सिनेमातील प्रत्येक गाण्याने तरुणाईला भूरळ घातली होती. आजही या सिनेमाची गाणी रसिक गुणगुणतांना दिसतात... 'न भुतो न भविष्यती' असं यश या सिनेमाने मिळविलं होतं. खरंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या फ्रेश कपलवर निर्मात्यांनी सट्टा खेळला होता. मात्र, सिनेमातील या दोघांच्या अभिनयापेक्षा सिनेमातील गाण्यांचीच जास्त चर्चा झाली. नदिम-श्रवण या जोडीने संगीतबध्द केलीली ही गाणी आलटाईम हिट ठरलीत. 

आशिकी सिनेमाची क्रेझच इतकी होती की भट कॅम्पने बनविलेल्या 'आशिकी 2' या सिनेमालाही धमाकेदार यश मिळाले. 2013 साली आलेल्या 'आशिकी 2' मध्येही भट कॅम्पने आदित्य रॉय कपूर आणि श्रध्दा कपूर या फ्रेश कपलला चान्स दिला. यावेळी, मात्र दोन्ही कलाकारांनी हा विश्वास सार्थ ठरवत सिनेमात सहजसुंदर अभिनय केला. सिनेमातील गाण्यांबरोबरच आदित्य आणि श्रध्दाच्या कामाचंही खुप कौतुक झालं. मोहित सुरीने आशिकी-2चं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमानं 100 कोटींची कमाई करत श्रध्दा कपूरलाही रातोरात स्टार बनविलं.

आशिकी आणि आशिकी-2 या सिनेमांतील समान धागा म्हणजे या सिनेमांचं संगीत... दोन्ही सिनेमांतील गाणी हिट झाली होती. संगीतकार प्रीतमने संगीतबध्द केलेल्या आशिकी-2च्या गाण्यांनीही सगळे रेकॉर्ड तोडले. आशिकी हा आता ब्रॅण्ड झाला असून भट कॅम्प आता आशिकी 3 बनविण्याच्या तयारीत आहे. 'आशिकी' आणि 'आशिकी 2' हे दोन्ही सिनेमे क्लासिक हिट झाल्यामुळे साहजिकचं आशिकीचा पुढचा पार्टही सुपरहिट होईल अशी आशा करायला हरकत नाही. 

'आशिकी'मधलं एक गाणं... खास तुमच्यासाठी...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.