...आणि अनुष्कानं विराटला मिठी मारली!

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'वोग इंडिया ब्युटी अवॉर्डस २०१५'च्या निमित्तानं अनुष्का शर्मा पहिल्यांदाच विराट कोहलीसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. 

Updated: Jul 23, 2015, 02:26 PM IST
...आणि अनुष्कानं विराटला मिठी मारली! title=
सौ. फेसबुक

मुंबई : मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'वोग इंडिया ब्युटी अवॉर्डस २०१५'च्या निमित्तानं अनुष्का शर्मा पहिल्यांदाच विराट कोहलीसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. 

हे लव्हबर्डस या कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं. यावेळी, अनुष्काला 'ब्युटी ऑफ द इअर'चा अवॉर्ड दिला गेला. विराट आपल्या लेडी लव्हला सपोर्ट करण्यासाठी इथं दाखल झाला होता. 

यावेळी, अनुष्कानं गौरी-नैनिकाचा लेमन कलरचा सुंदर ड्रेस परिधान केला होता... सोबत विराटही होता. यामुळे तीचं तेज जास्तच खुलून दिसत होतं. 

Virat Kohli and Anushka Sharma at Vogue India Beauty Awards. Photo Courtesy: Facebook
सौ. फेसबुक 

यावेळी, विराटनं तुला कसं कॉम्प्लिमेंट केलं? असा प्रश्न अनुष्काला विचारला गेला तेव्हा तर तिला आपलं हसू आवरण कठिण गेलं... 'तू आज लिंबूसारखी दिसतेयस असं आज विराटनं मला म्हटलं' असं सांगताना ती खळखळून हसली. 

या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत येण्यासाठी अनुष्कानं विराटला अनोख्या पद्धतीनं थँक्स म्हटलं. यावेळी, तिनं विराटला दोन्ही हातांमध्ये घेत घट्ट मिठी मारली. सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच अनुष्कानं आपलं विराटवरचं प्रेम असं व्यक्त केलं असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.