'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान

'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 31, 2016, 11:06 AM IST
'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वेलमध्ये इरफान खान   title=

मुंबई: 'लाइफ इन अ मेट्रो' सिनेमाच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा अभिनेता इरफान खान दिसण्याची शक्यता आहे.

2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात अभिनेता इरफान खानने भूमिका केली होती. त्यावेळी सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यासाठी अभिनेता इरफान खानने पसंती दर्शवलीये.

'लाइफ इन अ मेट्रो'च्या सिक्वलचे कथानक आधीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या सिक्वेलमध्ये संगीतकार प्रीतम चक्रवर्ती संगीत देणार आहेत. सिक्वेलच्या स्क्रिप्टवर पुढचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल असेही सूत्रांनी यावेळी सांगितले.