मुंबई : ऋतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँग बँग’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.
ऋतिक सोबत सहकलाकार म्हणून डान्स स्टेप्स आपल्यासाठी एक आव्हानच होतं असं कतरिनानं स्वीकार केलंय. पण, तिच्यासाठी खरं आव्हान वेगळंच होतं...
अॅक्शन आणि रोमान्सनं परिपूर्ण या सिनेमात कतरिनानं महत्त्वाची भूमिका पार पाडलीय. या सिनेमात ऋतिकसोबतच अनेक स्टंट कतरिनाच्या वाट्यालाही आलेत आणि हे सगळे स्टंट कतरिनानं स्वत: केलंय.
अनेकदा कठिण स्टंटस् शूट करताना अॅक्टर्सच्या बॉडी डबलचा वापर केला जातो. पण, कतरिनानं मात्र याला फाटा दिलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, कतरिनानं ‘बँग बँग’मध्ये काही सीन्समध्ये स्वत:च स्टंट केलेत. यासाठी तिनं बरीच मेहनतही घेतलीय.
हा सिनेमा येत्या २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच वेगवेगळ्या पद्धतीनं या सिनेमाला प्रेक्षकांची पावती मिळतेय. या सिनेमाच्या गाण्यांनी धम्माल उडवून दिलीय.
हा सिनेमा म्हणजे, टॉम क्रूज आणि कॅमरून डियाज अभिनीत हॉलिवूड सिनेमा ‘नाईट अँन्ड डे’ याचं रुपांतर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.