लाईव्ह रिपोर्टिंगवेळी महिला पत्रकाराला मारहाण

पेनसिल्वेनियाच्या फिलाडेल्फियामध्ये टेलीमंडो 62 या चॅनलच्या महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना मारहाण करण्यात आली आहे.

Updated: Jun 13, 2016, 04:51 PM IST
लाईव्ह रिपोर्टिंगवेळी महिला पत्रकाराला मारहाण title=

फिलाडेल्फिया : पेनसिल्वेनियाच्या फिलाडेल्फियामध्ये टेलीमंडो 62 या चॅनलच्या महिला पत्रकाराला लाईव्ह रिपोर्टिंग करताना मारहाण करण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतं आहे. 

ही महिला लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना मागून आलेल्या एका महिलेनं मागून येऊन या महिला पत्रकाराचे केस ओढले आणि तिला हाणामारी करायला सुरुवात केली. या महिला पत्रकाराचं नाव आयरिस डेलगाडो आहे. हिरव्या टी शर्टमध्ये आलेल्या एका महिलेनं आयरिसच्या खांद्यावर हात ठेवला आणि मारहाणीला सुरुवात केली. 

पाहा मारहाणीचा व्हिडिओ