`हा तर धंदा`... `आयफोन`साठी भाड्याची माणसं!

नवीन मोबाईलची हवाही मार्केटमध्ये इतकी पसरलीय की लोक या मोबाईलसाठी दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यासही तयार आहेत. आणि ज्यांना रांगेत उभं राहणं शक्य नाही असे लोक रांगेत उभं राहण्यासाठी इतरांना भाडं मोजत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 24, 2013, 09:57 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया
आयफोनची वाढती क्रेझ लक्षात घेऊन अॅपलनं नुकतेच ‘आयफोन ५ एस’ आणि ‘आयफोन ५ सी’ हे दोन मोबाईल समोर आणलेत. या नवीन मोबाईलची हवाही मार्केटमध्ये इतकी पसरलीय की लोक या मोबाईलसाठी दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यासही तयार आहेत. आणि ज्यांना रांगेत उभं राहणं शक्य नाही असे लोक रांगेत उभं राहण्यासाठी इतरांना भाडं मोजत आहेत.
होय, हे खरं आहे... रांगेत उभं राहण्यासाठी ठरवलेले पैसे न मिळाल्यानं पोलिसांसमोर ही घटना उघड झालीय. आयफोनची मोठी क्रेझ आहे. बाजारात `आयफोन ५ एस` आणि `आयफोन ५ सी` हे नवीन मोबाईल येत आहे. आयफोन मिळवण्यासाठी एका व्यावसायिकानं रांगेत उभं राहण्यासाठी भाड्यानं लोकांना उभं केलं होतं. आपल्या दुकानापासून जवळजवळ १६ कि.मी अंतरावरून ७० ते ८० बेघर लोक या व्यावसायिकानं भाड्याने आणले होते. रात्रभर रांगेत उभे राहण्यासाठी त्यांना पैशाचे अमिष दाखविण्यात आले.
पण, रात्रभर रांगेत उभं राहणाऱ्या लोकांना सकाळी मात्र पैसे देण्यास या व्यावसायिकानं टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे त्यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण सकाळी साडेसात वाजल्याच्या सुमारास पोलिसांत पोहचले. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालावं लागलं आणि सारा प्रकार त्यांच्या ध्यानात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
‘रांगेत उभे राहण्यासाठी आम्हाला ४० डॉलर देण्याचे व्यावसायिकानं मान्य केले होतं मात्र त्यानंतर त्याने पैसे देण्यास नकार दिला’ अशी तक्रार रांगेत उभं राहणाऱ्या डॉमिनो मूडी यानं नोंदवलीय.

आयफोन मिळवण्यासाठी भाड्यानं व्यक्ती उभ्या करण्याचं कारण विचारलं असता त्या व्यावसायिकाच्या उत्तरानं अगदी पोलीसही चाट पडले होते. व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, हे आयफोन मिळवल्यानंतर बाहेर ते जास्तीत जास्त नफा मिळवून विकता येणार होते... आणि असं करणं म्हणजे काही गुन्हा नाही, तो एक धंद्याचाच भाग आहे, असंही स्पष्टीकरण त्यानं दिलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.