थरारक व्हिडिओ : विमानाच्या छतावर बाईक चालवताना कधी पाहिलीत का?

आपल्या स्टंटसमुळे बऱ्याचदा चर्चेत राहणऱ्या 'रॉबी मॅडिसन' हा पुन्हा एक चित्तथरारक स्टंट घेऊन आलाय. 

Updated: Oct 21, 2015, 01:04 PM IST
थरारक व्हिडिओ : विमानाच्या छतावर बाईक चालवताना कधी पाहिलीत का? title=

मुंबई : आपल्या स्टंटसमुळे बऱ्याचदा चर्चेत राहणऱ्या 'रॉबी मॅडिसन' हा पुन्हा एक चित्तथरारक स्टंट घेऊन आलाय. 

34 वर्षीय रॉबी मॅडिसन हा 'मॅडो' नावानं अनेकांना परिचित आहे... सध्या त्याचा विमानाच्या छतावरून बाईक चालवण्याचा एक व्हिडिओ सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय. 
 
सोशल साईट यूट्यूबवर अपलोड केलेल्या हा व्हिडिओ अमेरिकन राज्य एरिझोनाच्या टक्सन स्थित मिलिटरी सर्व्हिस एअरप्लेन ग्रेव्हयाईडात रॉबीनं हा स्टंट केलाय... आपला जीव धोक्यात घालून त्यानं केलेला हा स्टंट लोकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.