VIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं

साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.

Updated: May 4, 2016, 11:38 PM IST
VIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं title=

नवी दिल्ली : साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.

साऊथ कोरियातल्या प्योंगटेक भागातील एका इमारतीला आग लागली होती. यावेळी, महिला आपल्या मुलांसहीत या आगीत सापडली होती. हे सगळे जण इमारतीच्या चौथ्या मजल्यावर खिडकीत उभे राहून मदतीसाठी याचना करत होते.

शेवटी आईनंच आपला आणि आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी एक धाडसाचं पाऊल उचललं. अगोदर तिनं आपल्या मुलांना खाली उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेनं फेकलं... गर्दीनंही अलगद मुलांना झेललं... त्यानंतर महिलेनं स्वत:ही खाली उडी मारली. 

तिच्या या धाडसामुळेच या सर्वांचे प्राण वाचू शकलेत. परंतु, हे थरारक दृश्य ज्यांनी पाहिलं त्यांच्या काळजाचा मात्र थरकाप उडाला होता. हा सगळा प्रसंग एका कॅमेऱ्यातही कैद झालाय.