मुंबई : जपानमध्ये लवकरच चक्क एक 'अदृश्य' ट्रेन पाहायला मिळणार आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जपान एक अदृश्य ट्रेन विकसित करत आहे... तुम्ही बारकाईनं पाहिलंत तरच ही ट्रेन तुम्हाला दिसू शकेल.
वास्तूकार काजूयो सेजिमा यांनी ही ट्रेन डिझाइन केलीय. काचेचा वापर करून ही ट्रेन बनवण्यात आलीय. अर्ध पारदर्शी असलेली ही ट्रेन आपल्या आजूबाजूला असणाऱ्या रंगात मिसळून जाते. २०१८ पर्यंत ही रेल्वे लोकांसमोर येणार असल्याची आशा व्यक्त केली जातेय.