www.24taas.com, झी मीडिया, लंडन
लंडनमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच मजेशीर किस्सा घडलाय. सेक्सवर्कर म्हणजेच वेश्या सुंदर निघाली नाही म्हणून लंडनमध्ये एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच फोन लावला. आपल्याला या सेक्सवर्करनं फसवलं अशी तक्रार दाखल करून घ्यावी, असा तगादाही त्यानं पोलिसांकडे लावला.
वेस्ट मिडलँडसच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं त्यांना फोन करून एका सेक्सवर्कर विरुद्ध ‘सेल्स ऑफ गुडस् अॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. (विक्रेत्यानं खोटी माहिती देऊन माल विकला असेल तर त्याच्यावर या अॅक्टनुसार गुन्हा नोंदविला जातो). या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, सेक्सवर्कर तेवढी सुंदर नव्हती जेव्हढं तिनं आपण सुंदर असल्याचं फोनवर सांगितलं होतं. एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये हा व्यक्ती सेक्सवर्करला जेव्हा भेटला तेव्हा त्याला आपल्याला फसवलं गेलं असं वाटलं. त्यानं तिला हे सांगितल्यावर ती सेक्सवर्कर तिथून निघून गेली.
बर्मिंगहॅम पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की असा कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कुणालाही पैसे देऊन सेक्ससाठी मागणी करणंदेखील गैर असल्याचं पोलिसांनी त्याला सांगितलं. इतकंच नाही तर पोलिसांनी पत्र पाठवून या व्यक्तीला पुन्हा पोलिसांचा वेळ अशा पद्धतीनं वाया घालवू नये, अशी जरबही दिलीय. तिथल्या कायद्यानुसार, पोलिसांचा वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तीला दोषी आढळल्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षाही होऊ शकते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.